अमृतमहोत्सवी स्वतंत्र भारत* *मागील 75 वर्षे वर्षे व पुढील 25 वर्षे*
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले –
स्वातंत्र्य हे गुलाबपाणी शिंपडून नाही तर ते अनेक शूर वीर क्रांतीकारकांनी आपले रक्त सांडून मिळवले आहे याचं प्रत्येक नागरिकांनी भान ठेऊन संविधानामध्ये उल्लेखलेल्या न्याय समता स्वातंत्र व बंधुता या चार स्तंभावर आधारलेल्या लोकशाहीचा सन्मान होईल अशा वर्तणुकीतून स्वतःला सिद्ध करण्याच्या क्षमता विकसित केल्या पाहिजेत कारण *”स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी*” १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला स्वतंत्र राहण्यासाठी चार युद्धे करावी लागली( चार पाकिस्तान व एक चीनबरोबर)
स्वातंत्र्योत्तर काळात केंद्र व राज्य सरकारने नेमलेल्या विविध आयोग व समित्यांनी भरीव योगदान देऊन कृषी, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक, व वाणिज्य क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली जेणेकरून जनतेचा राहणीमान व जीवनमानाचा दर्जा उंचावला.
जागतिक दर्जाच्या गुगल मायक्रोसॉफ्ट यासारख्या कंपन्यामध्ये भारताचे सीईओ आहेत. अंतराळ व क्षेपणास्त्रे इ मध्ये आपले प्रभुत्व आहेच, कोरोनाच्या संकटातही लस बनवून भारताने जगाला आत्मनिर्भर असल्याचे दाखवून दिले.
पुढील२५ वर्षात व्हिजन२०४७ म्हणजेच स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी सुदृढ मनोवृत्ती असलेली राजकीय नेतृत्व उदयास आली पाहिजेत कारण स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळी होत्या आता कार्यक्रम म्हणजे दिखावे आहेत थोडक्यात moment to event हे स्थित्यांतर व संस्काराधिष्ठीत असावीत समाज व संस्कृती यांची वैभव वाढवणारी बीजे मनामनात पेरली जावीत. म्हणजे माणूसकीची मुळे फुलतील आणि जिथे मुल्यांचा पराभव होणार नाही असे ज्ञानाचे उपयोजन व्हावे.
*जय हिंद! जय भारत!!
दयाराणी विलास खरात
जि प शाळा माणगंगानगर
ता-माण जि- सातारा
छाया – दयाराणी खरात