डॉ.राहुल खाडे यांची जालनाच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (अहमद मुल्ला )
 By : दौलत नाईक
दहिवडी /प्रतिनिधी :
            पळशी ता. माण या गावचे सुपुत्र व अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे यांची नियुक्ती जालनाच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नुकतीच झाली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे.
   गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.  जालना येथील अप्पर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांची ८ नोव्हेंबर २०२२ रोजी पोलीस उपायुक्त पुणे शहर येथे बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते.शासनाच्या गृह विभागाकडून  अमरावती  गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.राहुल खाडे यांनी  यापूर्वी औरंगाबाद येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!