*माजी विद्यार्थ्यांकडून मलवडीच्या त्रिंबकराव काळे विद्यालयास लाखाची भेट*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड
By ;दौलत नाईक*
दहिवडी/प्रतिनिधी :
                                                   आपण ज्या शाळेमुळे घडलो त्या शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न त्रिंबकराव काळे विद्यालय मलवडी (ता. माण) मधील १९९६ – ९७ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यांनी आपल्या शाळेला एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचे साहित्य भेट दिले आहे.
                              दहावी १९९६ – ९७ बॅचचा स्नेहमेळावा प्रथमच आयोजित करण्यात आला होता. या स्नेहमेळाव्यास जीवन शिक्षण विद्या मंदिर तसेच माध्यमिक विद्यालयात शिकवलेल्या शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले होते. स्वागत झाल्यानंतर सिमा भुजबळ, सुषमा शिंदे, सचिन शिंगाडे या माजी विद्यार्थ्यांनी तर भालचंद्र खटावकर, सुभाष सस्ते, मानसिंग शिंदे, रामचंद्र बंडगर आदी शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली. मनोगत व्यक्त करताना सर्वचजण भावनिक झाले होते. अनेक वर्षांनंतर एकत्रित आल्याने सर्वांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.
                        या विद्यार्थ्यांनी मोठ्या मनाने विद्यालयास संपुर्ण स्पीकर सेट, स्पर्धा परीक्षेसाठीची उपयुक्त पुस्तके, त्यासाठी लागणारे कपाट, स्पर्धा परीक्षा वाचनालयासाठी खुर्च्या व टेबल आदी साहित्य भेट दिले. तसेच आजी गुणवंत विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य भेट स्वरुपात मिळाल्याने मुख्याध्यापक मनोहर तांबे हे भारावून गेले.
                 यावेळी एम. डी. काळे, एस. एस. काटकर, भुजबळ सर, एस. वाय. सावंत, शेंडे सर, टिकोळे सर, गाडे सर, श्री भोसले, श्रीमती सावंत, श्रीमती कुलकर्णी, श्रीमती जगदाळे, श्रीमती बंडगर, श्रीमती मदने आदी मान्यवर शिक्षक उपस्थित होते. मनोज बंडगर यांनी प्रास्ताविक केले. रेखा घनवट हिने सूत्रसंचालन केले तर राहुल महाडिक याने आभार मानले. निलेश राऊत, दत्तात्रय गोरे, हेमंत कदम, फिरोज मुलाणी, राहुल महाडिक, रेखा घनवट, सीमा भुजबळ, मिना कदम यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.
………..
 “आमच्या शाळेने आम्हाला जी आयुष्याची शिदोरी दिली त्यापुढे आम्ही केलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. यापुढेही दरवर्षी आम्ही शाळेला मदत करण्याचा प्रयत्न करु.” निलेश राऊत, माजी विद्यार्थी.
………….

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!