माणगंगा नदीवरील म्हसवड देवापूर रस्त्याला जोडणाऱ्या पुलाची त्वरीत दुरुस्ती करावी अन्यथा मोठे आंदोलन करणार : कुमार सरतापे
व्हिजन२४ तास न्यूज
By Ahmad Mulla
म्हसवड :
म्हसवड येथील यात्रा पटांगणा शेजारी असलेला माणगंगा नदीवरील देवापूर आटपाडी, सांगली या बाजूला जाणारा माणगंगा नदीवरील पुल अतिशय धोकादायक झाला असून पृष्ठभागावर अनेक खड्डे पडल्याने या खड्ड्यातुन बांधकामातील लोखंडी गज बाहेर आले आहेत एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी बांधकाम विभागाने तातडीने या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष कुमार सरतापे यांनी केली आहे .
सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांना म्हसवड पालिकेचे माजी नगराध्यक्ष कुमार सरतापे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि देवापूर वरकुटे सांगली, आटपाडी, जत व दिघंची आदी गावांना जोडणारा हा पुल माणगंगा नदीवर माजी नगराध्यक्ष विलासराव माने यांनी १५ वर्षा पूर्वी तत्कालीन राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या निधीतून हा पूल बांधण्यात आला असून बांधकाम विभागाने पुल बांधल्या .पासून पुलाची कसल्याही प्रकारची डागडुजी केलेली नाही या पुलाचा पाया देखिल खचला आसल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे त्याच प्रमाणे पुलाच्या वरील पृष्ठभागावरील सिमेंट काँक्रीट निघून गेल्याने लोखंडी गज वर आल्याने पुलावरुन पायी चालत जाणाऱ्या अनेकांना बऱ्याचदा जखमाझाल्या आहेत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाना देखिल लोखंडी गज धोकादायक आहे बांधकामातून वर आलेल्या गजामुळे वाहतूकीस अडथळा होऊन मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने माण तालुका बांधकाम विभाग व सातारा जिल्हा बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून.. पुलाच्या पृष्ठभागावर कॅक्रिट मधून वर आलेले गज, पुलावर पडलेले छोटे छोटे खड्डे व पुलाचा खचत चाललेला पाया तातडीने दुरुस्त करावा अन्यथा या पुलावर आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक कुमार सरतापे यांनी दिला आहे