अहिंसा पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी कायम जोपासली – इंजि. सुनील पोरे*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
सतत निरनिराळ्या सेवाभावी संस्थाना,होतकरू विद्यार्थ्याना तसेच अनेक सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात  भरीव मदत करणाऱ्या संस्थांपैकी  अहिंसा पतसंस्था म्हसवड एक संस्था असल्याचे प्रतिपादन  इंजि. सुनील पोरे  यांनी केले
 म्हसवड येथील अहिंसा पतसंस्थेच्या वतीने  पर्यंती येथील विद्यार्थिनी कु. निकिता नरळे हीस्  सामाजिक कार्यकर्ते इंजि सुनील पोरे यांच्या हस्ते सायकल देण्यात आली.
  यावेळी प्रमुख मान्यवर माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीन भाई दोशी, पर्यंती हायस्कूलचे शिक्षक गलंडे  सर, भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष प्रवीण दोशी,  संचालक प्रीतम शहा उपस्थित होते.
   या प्रसंगी सुनील पोरे म्हणाले कु.निकितास पतसंस्थेने सायकल भेट देऊन तिच्या शिक्षणासाठी खूप मोठी मदत केलीआहे. समाजातील गरजू घटकांना कायम मदत करणारी अहिंसा पतसंस्था आहे. अहिंसा पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी कायम जोपासली आहे.
   यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन भाई दोशी मनोगत व्यक्त करताना म्हणाले अहिंसा पतसंस्थेचे ब्रीद वाक्य आहे सहकारातून सेवा व त्याप्रमाणे पतसंस्थेचे कामकाज चालते.  माण तालुक्यातील अनेकांना मदत करण्याचे काम आज पर्यंत पतसंस्थेच्या माध्यमातून गेली २० वर्षे सुरू आहे.
   सुनील पोरे यांनी सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर समाजसेवेचे वृत्त स्वीकारले असून ते व त्यांचे कुटुंबीय फार चांगल्या पद्धतीने समाजाची सेवा करीत आहेत. यावेळी पर्यंती हायस्कूलचे शिक्षक गलंडे सर यांनी ही मनोगत व्यक्त केले.
   राजेंद्र डोंगरे, यशोधर होरा ,व्यवस्थापक दीपक मासाळ व मान्यवर उपस्थित होते.  प्रास्ताविक निरज् व्होरा व सूत्र संचालन अक्षय धट यांनी केले आभार श्री महेश पतंगे यांनी मानले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!