व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) सचिन मंगरुळे म्हसवड प्रतिनिधी –
काल बुधवार येथील आठवडा बाजारा दिवशी रात्री आठच्या सुमारास शिवाजी चौका नजीकच्या बोळातील कापड दुकानात कापड खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गाळ्यातील दिड तोळ्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या तोंडाला मास्क घातलेल्या दोघा जणांनी लंपास केल्याची घटना घडली.
याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी येथील ग्रामदैवत श्री सिध्दनाथ मंदिरात पूजेसाठी आलेल्या फलटण येथील भाविक महिला येथील शिवाजी चौकाजवळच्या बोळात एका कापड दुकानात पूजेसाठी लागणारे कापड खरेदी करण्यासाठी गेली होती तिच्या सोबत अन्य दोन महिलाही होत्या दुकान समोर सर्व जण उभ्या असतानाच तोंडाला कापड बांधलेले दोघे जण होंडा कंपनीच्या शाईन दुचाकीवरून अंदाजे तीस व पंचवीस वर्षे वयाचे दोघे दुचाकीस्वार आले आणि भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दिड तोळे वजनाचे गंठण तोडून घेऊन पसार झाले आहेत.