कोळी समाज संघटनांची शिखर संस्था असलेली कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्य सदस्य पदी व माढा लोकसभा अध्यक्षपदी आण्णासाहेब कोळी यांची सर्वांनुमते नियुक्ती करण्यात आली.
लोणावळा येथे कोळी महासंघाची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. यावेळी सहा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आल्या.
हिंगणी ता. माण जिल्हा सातारा येथील अण्णासाहेब कोळी हे राज्यस्तरावर विविध संघटना, पत्रकारिता, मंत्रालयीन कामकाज, प्रशासकीय,राजकीय,सामाजिक अशा विविध स्तरांवर काम करीत आहेत.यांना यावेळी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश बोबडी, कोळी महासंघ उपनेते श्री देवानंद भोईर,श्री अभय पाटील-कोकण विभाग प्रमुख, श्री अजय बहीरा-नगरसेवक पनवेल महानगरपालिका, श्री गणेश धानिवले (भाजपा नेते)श्री प्रवीण निकुंबे (आरोग्य अधिकारी धुळे) श्री कुमार कोळी, श्री अण्णासाहेब कोळी, श्री भालचंद्र वरसोलकर, श्री राजेंद्र चुनेकर,श्री तुषार शिंदे, श्री अनिल केळगणे, श्री तुषार रोकडे, श्री ज्ञानेश्वर देवळेकर, श्री ताराचंद कोंडाजी, श्री मनोज निकम, श्री वसंत कोळी ( कामगार नेते ) इतर कोळी महासंघाचे सहा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अण्णासाहेब कोळी यांच्या नियुक्ती बद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
“माढा लोकसभेमध्ये आदिवासी कोळी समाजाचे निर्णायक सुमारे १४७५७४ मतदान असुन सन २०२४ च्या होत असलेल्या माढा लोकसभेमध्ये निर्णायक ठरणार – आण्णासाहेब कोळी”