दृष्टिहीनांसाठी आधारिका फाउंडेशनचा आनंदमयी गरबा उत्सव

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
विनायक मोरे यांचे कडून
मुंबई : प्रतिनिधी
अंध व्यक्तींसाठी गरबा हा केवळ नृत्याचा कार्यक्रम नसून आत्मविश्वास, आनंद आणि एकतेचा पर्व ठरतोय. यंदा आधारिका फाउंडेशनतर्फे विशेष “दृष्टिहीन गरबा संध्या” आयोजित करण्यात आली.

 

दांडियाच्या सुरावटींवर केवळ स्वरांच्या आधाराने दृष्टिहीन बांधवांनी मनमोकळा ठेका धरला. रंगीबेरंगी वेशभूषा, उत्साहपूर्ण वातावरण आणि ऊर्जेने भरलेली नृत्यरात्र प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरली.

या उपक्रमाचा उद्देश दृष्टिहीनांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे आणि त्यांना स्वतःच्या कलागुणांना वाव देणे हा होता. नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून सहभागी स्पर्धकांनी आत्मविश्वासाने आपली प्रतिभा सादर केली. विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

गेल्या वर्षीच्या यशानंतर यंदाही प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कुटुंबीय, समाजातील मान्यवर आणि स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अधिकच संस्मरणीय ठरला.

आधारिका फाउंडेशनचे हे उपक्रम दृष्टिहीनांच्या जीवनात आनंदाची आणि आत्मविश्वासाची नवी ज्योत प्रज्वलित करत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *