माण तालुक्यात समता सप्ताह उत्साहात साजरा
म्हसवड (अहमद मुल्ला ) :
शिक्षण विभाग, समवेशित शिक्षण पंचायत समिती माण अंतर्गत माण तालुक्यामध्ये समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीमध्ये समता सप्ताह दिन मा. गटशिक्षणाधिकारी राऊत साहेब, मा. तालुका संपर्कप्रमुख कोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व विस्ताराधिकारी, सर्व केंद्रप्रमुख व विषय साधन व्यक्ती यांच्या सहकार्यातून महात्मा गांधी विद्यालय दहिवडी येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत ,प्रभात फेरी,काव्यावाचन,गीतगायन,वेशभु षा, चित्रकला, निबंध, रांगोळी,बालक पालक परिसरात चर्चासत्र गुणवंत दिव्यांग विद्यार्थी मुलाखत,यशस्वी दिव्यांग व्यक्ती मुलाखत.अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम सर्व दिव्यांग विद्यार्थी मध्ये प्रेरणा,चेतना, उत्तेजन निर्माण होण्यासाठी, सर्व शासकीय योजना, सेवा सवलती, सोयीसुविधा मिळावी म्हणून व समाजामध्ये जनजागृती होण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून माण तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शाळास्तर,केंद्र स्तर व तालुका स्तरावर समता सप्ताह राबविण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे नियोजन समावेशित तज्ञ श्री गोरड आर व्ही व श्री काळेल बी एच
तसेच विशेष शिक्षक काशीद एस एस, जगताप जी.बी, गोरड ए एस, शेटे व्ही एम, काळेल बी.ए महानवर व्ही एच, ठोंबरे पी.व्ही यांनी केले.