माण तालुका शालेय बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा संभूखेडची उज्ज्वल घोडदौड
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
माण तालुका शालेय बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा संभूखेड (ता. माण, जि. सातारा) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विजयी घोडदौड केली आहे. विविध वयोगटातील स्पर्धेत संभूखेड शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान मिळविला.
१४ गटाखालील यशस्वी विध्यार्थी :
मुले : मयुरेश सतिश काटे याने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या गावाचे नाव रोशन केले.
मुली : आर्या हरिदास काटे द्वितीय, महेश्वरी संतोष काटे तृतीय तर श्रुती बजरंग रूपनवर चतुर्थ क्रमांकावर आली.
१७ वयोगटाखालील यशस्वी विध्यार्थी-
मुले : आर्यन शिवाजी सरतापे प्रथम, वैभव सतिश काटे द्वितीय, तर यश बापूराव काटे पाचव्या क्रमांकावर.
मुली : श्रेया हरिदास काटे द्वितीय आणि वैष्णवी अजिनाथ मोहिते चतुर्थ क्रमांकावर.
या स्पर्धेत 20 पात्र विद्यार्थ्यांपैकी तब्बल 9 विद्यार्थी एकट्या संभूखेड गावचे ठरले आहेत. ही कामगिरी खरोखरच लक्षणीय असून संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी मा. पिसे साहेब, विस्तार अधिकारी सौ. तांबोळी मॅडम, केंद्रप्रमुख मा. गंबरे साहेब तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास काटे व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या यशामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका श्रीमती कथले मॅडम, श्री. दराडे सर, श्री. ननवरे सर, श्री. सावंत सर या सर्वांचे विशेष योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच संभूखेड शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर पोहोचण्याचा मान मिळविला आहे.
गावकरी व पालकांनीही या विजयी खेळाडूंचा सन्मान करून त्यांना जिल्हास्तरासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

