म्हसवड :प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या मेघा सिटी क्रीडा संकुल ,म्हसवड येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करून अनुक्रमे महिला 32 किलो गटातून कुमारी वेदिका विकास कोळेकर व पुरुष 32 किलो वजनी गटातून कुमार सुशील समिंदर विरकर यांचा प्रथम क्रमांक आला तसेच पुरुष 34 किलो वजनी गटातून कुमार विठ्ठल जिजाबा विरकर याने प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरासाठी आपली निवड निश्चित केली. विरकरवाडी गावाला मल्लविद्येची देदीप्यमान मल्ल परंपरा आहे. मात्र महिलांचा या क्षेत्रात येण्याचा कल फारसा दिसून येत नाही. कुमारी वेदिका कोळेकर सारख्या मुली आज कुस्ती सारख्या खेळाला आपल्या करिअरचा भाग म्हणून निवडत आहेत. त्यांना सहकारी पाठबळाची गरज आहे. गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे,केंद्रप्रमुख दीपक पतंगे यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी व निरोगी भविष्यासाठी खेळामध्ये सकारात्मक प्रयत्न करणाऱ्या पालकांचे मार्गदर्शक शिक्षकांचे व मानदेशी फौंडेशनचे आदर्श शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ वीरकरवाडी यांच्याकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.