माण तालुका स्तरीय स्वच्छ, सुंदर ,उपक्रमशील ,गुणवत्ता पूर्ण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्पर्धेत मोठया गटात जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा विरकरवाडी ने तृतीय क्रमांक पटकावला. सन 2023 2024 या शैक्षणिक वर्षात नुकतेच या शाळेने सहभाग नोंदवला .व स्वच्छ, सुंदर उपक्रम शील ,गुणवत्ता पूर्ण स्पर्धेनिमित्ताने तालुका स्तर मूल्यांकन झाले .यामध्ये शाळेच्या भौतिक सुविधा, शालेय परिसर,विविध स्पर्धेतील यश,नाविन्यपूर्ण उपक्रम,शाळा व्यवस्थापन समिती आयोजित उपक्रम,व विद्यार्थी केंद्रित उपक्रम,बचत बँक,वाचनालय, या सर्व उपक्रमाची पाहणी करण्यात आली.त्यामध्ये शाळेने तृतीय क्रमांक मिळवून हे यश संपादन केले. हे यश मिळविसाठी मुख्याध्यापक सुशील त्रिगुणे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विशाल विरकर,उपाध्यक्ष बाळराजे विरकर, सर्व सदस्य ,शिक्षक अनिता तोरणे,कांतीलाल खाडे, पल्लवी जगताप,शुभांगी रणदिवे, पूनम शेंडे यांनी उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतले. स्पर्धेत यश मिळाल्याबद्दल उपजिल्हाधिकारी मुंबई जे एम विरकरसाहेब, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षणविस्तार अधिकारी रमेश गंबरे,केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार,अशोक गंबरे ,माजी केंद्रप्रमुख जगन्नाथ विरकर,प्रा विठ्ठल सजगणे यांनी अभिनंदन केले.