वडिलांच्या 81 व्या वाढदिवसाच्या निमित्त जि प प्राथमिक शाळा विरकरवाडी येथील सर्व मुलांना मोफत वह्या वाटप

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड:

        माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील  उद्योजक विजयराज  पिसे यांनी वडिलांच्या 81 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरकरवाडी येथील पहिली ते सातवी पर्यंत सर्व मुलांना मोफत वह्या वाटप केले.

        यावेळी  ते म्हणाले की,जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा ही खऱ्या अर्थाने अतिशय सर्वगुणसंपन्न वसुंदर शाळा आहे.शाळेची गुणवत्ता चांगली असून भौतिक सुविधा नी परिपूर्ण आहे.शाळेला आवश्यकता असल्यास शाळेला सहकार्य करू असे सांगितले. राज चॅरिटेबल फौंडेशन पुणे यांच्या वतीने वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव एकनाथ पिसे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक सुशील त्रिगुणे यांनी आदर्श व्यक्तिमत्त्व असलेले विजयराज पिसे यांचे स्वागत केले.सर्व मुलांना वह्या मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. या वेळी अनिता तोरणे,कांतीलाल खाडे, पल्लवी जगताप,शुभांगी रणदिवे, पूनम शेंडे इत्यादी शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!