सौ शुभांगी बोबडे यांच्या  “नवोपक्रमाची” राज्यस्तरासाठी निवड

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार  ढालपे
गोंदवले –

सातारा जिल्हा परिषद, सातारा वतीने घेण्यात आलेल्या सन २०२३_२४ च्या जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरावस्ती(टाकेवाडी) या शाळेच्या शिक्षिका सौ शुभांगी पंकज बोबडे यांच्या “काटेरी छत्रछाया ” या पर्यावरण विषयक नवोपक्रमाची राज्यस्तरासाठी निवड झाली .

माण तालुक्यातील तोंडले केंद्रातील दुर्गम शाळा जि प शाळा दरावस्ती येथील  परिसरात त्यांनी हा उपक्रम राबवला.  त्यांच्या या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती दरावस्ती , विद्यार्थी तसेच पालक ग्रामस्थ यांनी त्यांना खूप सहकार्य केले.

 त्यांच्या  या यशाबद्दल गटविकास अधिकारी माननीय श्री प्रशांत राऊत साहेब, गटशिक्षणाधिकारी माननीय श्री लक्ष्मण पिसे साहेब ,शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंबरे साहेब, तोंडले केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री गंबरे साहेब तसेच जिल्हा परिषद शाळा दरावस्ती चे मुख्याध्यापक श्री अशोक गोरे सर यांनी त्यांचे अभिनंदन केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!