तरुणांनो नोकरीच्या मागे न लागता स्वत:उद्योजक बना”:उद्योजक रामदास माने
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक: अहमद मुल्ला )
म्हसवड
तरुणांनो नोकरीच्या मागे न लागता स्वत:उद्योजक बना”हा संदेश घेऊन राज्यभर प्रसिध्द असलेले व्याख्याते प्रसिध्द उद्योजक रामदास माने यांनी आमचे म्हसवड येथील “पटेल कन्ट्रक्शन्स”फर्मला सदिच्छा भेट दिली.*
*श्री.माने साहेब यांच्या प्रेरणेमुळे इंजि.सद्दाम चोपदार याने स्थापत्य अभियंता पदवी शिक्षण पुर्ण करताच नोकरीच्या मागे न लागता बांधकाम उद्योगात पाऊल टाकले व मोठ्या जिद्दीेने व कष्टाने म्हसवड परिसरात बांधलेल्या बंगलो.हॉस्पिटल सह इतर प्रत्येक बांधकामांना श्री रामदास माने यांनी समक्ष भेटी देऊन पाहणी केली.*
*इंजि.सद्दाम चोपदार याने नोकरीच्या मागे न लागता स्वत: नवउद्योजक बनून इतरांना रोजगार उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद देऊन त्याचे अभिनंदन केले.*
*”नोकरीच्या मागे न लागता तरुणांनी स्वत: उद्योजक बनावे हा उपदेश घेऊन राज्यभर व्याख्याने देत आहे. त्याचे फलीत इंजि.सद्दाम चोपदार हा बांधकाम क्षेत्रात यशस्वी नवउद्योजक बनला हे प्रत्यक्ष पाहता आले.याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मत श्री माने यांनी व्यक्त केले व नव उद्योजक सद्दाम चोपदार यास भावी वाटचाली च्या शुभेच्छा दिल्या.”