स्वातंत्र्य दिनानिमित्त अकलूज मध्ये योद्धा प्रतिष्ठानची वैचारिक प्रबोधन रॅली

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
शेखर राजाभाऊ खिलारे
     अकलूज
१५ ऑगस्ट म्हणजे सर्व भारतीयांसाठी आनंदाचा दिवस दीडशे वर्ष इंग्रजांचे पाय सर्व भारतीयांच्या छाताडावर नाचले ते पाय याच १५ ऑगस्टला गाडले गेले.आणि भारताचा तिरंगा ध्वज अभिमानाने डौलू लागला.
याच भारतीयांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय तळमळीने लोकशाही राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेत शोषित,पीडित, वंचितांना, बहुजनांना आणि पशुपक्षी प्राण्यांना सुद्धा संविधानाने न्याय दिला आहे, हेच संविधान बदलून हिंदूराष्ट्र निर्माण करण्यासाठी RSS,BJP सारख्या संघटना युद्ध पातळीवर काम करत आहेत.धर्माच्या नावावर लोकांना भडकावत आहेत,जाती-जातीत भांडणे लावत आहेत.कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून महापुरुषांचा अवमान करत आहेत,दंगली घडवून आणत आहेत,हत्याकांड घडवून आणत आहेत. जाती-धर्माच्या नावावर लोकांना भुरळ पाडत आहेत,तरी अशा सगळ्या घटनांपासून लोकांचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.वा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून, आंबेडकर चौक अकलूज ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जय शंकर उद्यान या मार्गाने पायी चालत “वैचारिक प्रबोधन रॅली ” काढण्यात आली.त्यावेळी अनेक देश प्रेमींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
*१) ये आझादी झूटी है. देश की जनता भुखी हैं !*                    *२) देशाला स्वातंत्र्य मिळाले.पण जनतेचं काय ?*
*३ )इथली जनता आजही धर्माच्या ठेकेदारांची गुलाम आहे.* ४) इंग्रजांमधील आणि आजच्या सरकारमधील फरक काय?
*५) वाढल्या शेतकरी आत्महात्या /शेतकरी टिकेल तर देश टिकेलं**६) स्त्रियांवरील वाढते बलात्कार,अत्याचार**- बेटी बचाव देश बचाव.* *७) बेरोजगारीमुळे होणाच्या युवकांच्या आत्माहत्यांना जबाबदार कोण ?**८) देशाचे भारतरत्न जुगाराची जाहिरात करत आहेत.**९) भारतीयांचे स्थालांतर वाढत आहे , का ?* *१०) भारत माझा देश आहे.भारत माझा देश राहावा !**११) रोजगार मिळणाऱ्या कंपन्या पर राज्यात जात आहेत.*12) सरकार अचानक बदलतंय !**१३) राजकारण्यांचा गोंधळ – राज्य देश चुकीच्या माणसांच्या हातात चाललाय**१४) त्यांनी किती ही जात-धर्म म्हणू द्या.आपण भारतीय असण्यावर ठाम राहू.*
सदर रॅलीत वरील विचारांच्या पाठ्या हातात घेऊन वैचारिक मत मांडले या विचारातून नक्कीच समाज प्रबोधन होईल अशी आशा आहे.आणि या रॅलीसाठी  अविनाश सोनावणे,अक्षय जाधव,लखन बेंद्रे,बच्चन साठे,शिवराम गायकवाड,करणभाऊ कांबळे,यांनी परिश्रम घेतले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!