पैलवान महालिंग खांडेकर यांना “राष्ट्रीय खलीपा  पुरस्कार २०२३”देऊन गुणगौरव

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
सुजन फौंडेशन आदिर्की बु, यांचेतर्फे  या वर्षी २०२३ चा  कुस्ती क्षेत्रातील विशेष कार्याचा गुणगौरव करुन  प्रथम दिला जाणार “राष्ट्रीय खलीपा  पुरस्कार २०२३” पैलवान महालिंग खांडेकर यांना जाहिर करुन आज संपन्न झालेल्या या कार्यक्रमात  पैलवान रणजीत जाधव खाशाबा जाधव यांचे चिरंजी व  पहिले हिंदकेसरी  श्रीपती खंचनाळे यांचे चिरंजीव पैलवान रोहित खंचनाळे यांचे उपस्थित   एनआयएस कोच महालिंग खांडेकर म्हसवड  यांना संमेलन अध्यक्ष दिनकर ताजने गुरुजी यांच्या हस्ते  राष्ट्रीय खलिफा 2023 पुरस्कार सन्मानपत्र शाहूशेला गौरवचिन्ह ढाल देऊन सन्मानित करण्यात आले.
 .या कार्यक्रमासाठी छत्रपती पुरस्कार विजेते नझरुद्दीन नायकवडी पैलवान, तुकाराम खांडेकर पैलवान दिनेश अंजनाळे हुबळी पैलवान राजेश वेठे पैलवान प्रेम पूर्वी धारवाड , पैलवान मनोहर आडके, हिंदकेसरी मारुती माने कुस्ती संकुलनचे सुधाकर माने सांगली, शिवानी सोनवणे नाशिक, कैलास जेजुरकर जुन्नर, वैशाली दहिवडे सोलापूर, मधुकर गिलबिले पुणे, जयसिंग लोखंडे कोरेगाव ,बापूराव सुळ, सुनिती धायगुडे खंडाळा, सौ मीताबाई ठोंबरे, क्रीडा प्रशिक्षक शुभांगी धसाडे मान्यवर उपस्थित होते . खांडेकर यांना खलीपा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे माणदेशी फौडेशनचे अध्यक्ष चेतना सिन्हा ,विजय सिन्हा ,प्रभात सिन्हा,रेखा कुलकर्णी, बंटी माने सर्व चॅम्पीयन कोच व श्रीराम कुस्ती संकुलचे सर्व संचालक, खडकीचे सर्व ग्रामस्थ  यांनी अभिनंदन केले

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!