पैलवान महालिंग खांडेकर यांना ‘राष्ट्रीय खलिपा २०२३’ पुरस्कार जाहीर
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक: अहमद मुल्ला )
म्हसवड
सुजन फौंडेशन आदिर्की बु, यांचेतर्फे कुस्ती क्षेत्रातील विशेष कार्याचा गुणगौरव करून कुस्ती क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या पैलवानाना पुरस्कार देण्यात येतो या वर्षी २०२३ चा कुस्ती क्षेत्रातील विशेष कार्याचा गुणगौरव करुन प्रथम दिला जाणार राष्ट्रीय खलीपा पुरस्कार २०२३ पैलवान महालिंग खांडेकर यांना जाहीर करण्यात आला आहे भारत स्वातंत्रयपूर्व काळात वस्तादला खलिपा असे संबोधले जात होते पैलवान महालींग खांडेकर यांनी राष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून काम केले आहे तसेच राष्ट्रीय स्तर व राज्यस्तरावर अनेक उत्तम खेळाडू घडवले याच त्यांच्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून याबाबतचे पत्र नुकतेच आज पैलवान खांडेकर यांना देण्यात आले

या पत्रात म्हटले आहे की पैलवान (NIS) कुश्ती कोच महालिंग रामा खांडेकर श्रीराम कुस्ती संकुल म्हसवड व माणदेशी ‘फौंडेशन म्हसवड ता. माण, जिल्हा सातारा यांना निमंत्रित करण्यास आनंद वाटतो की. रविवार दि, १/१०/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता आदर्कीबु” येथे पहिले महाराष्ट्र कुस्ती संमेलन २०२३ या क्रीडा क्षेत्रातील विशेष उपक्रमाचे आयोजन केलेआहे
सदर संमेलनामध्ये आपल्या कुस्ती क्षेत्रातील विशेष कार्याचा गुणगौरव करून समारंभपूर्वक सुजन फौंडेशन आदिर्की बु, या संस्थेच्या विद्यमाने ‘प्रथम दिला जाणार राष्ट्रीय खलिपा पुरस्कार २०२३ पैलवान महालिंग रखांडेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे, आपल्या मित्रपरिवारा समवेत हर्षभरे पुरस्काराचा स्विकार करावा. हि विनंती,
खांडेकर यांना खलिपा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे माणदेशी फौडेशनचे अध्यक्ष चेतना सिन्हा ,विजय सिन्हा ,प्रभात सिन्हा,रेखा कुलकर्णी, बंटी माने सर्व चॅम्पीयन कोच व श्रीराम कुस्ती संकुलचे सर्व संचालक, खडकीचे सर्व ग्रामस्त यांनी अभिनंदन केले व भविष्यात आशियायी ऑलंपीक व राष्ट्रकुल स्पर्धेसाठी खेळाडू घडवावेत अशी आशा व्यक्त केली