जगविख्यात तत्ववेत्ते प्रल्हाद पै यांची अहिल्या शिक्षण संस्थेला शनिवारी सदिच्छा भेट
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
लुनेश विरकर
म्हसवड -प्रतिनिधी
सद्गुरू संत वामनराव पै यांचे सुपुत्र व जीवन विद्या मिशनचे सर्वेसर्वा आदरणीय प्रल्हाद पै हे महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली ला शनिवार दि.२२जुलै रोजी सदिच्छा भेट देणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन प्रा.आर.एस.चोपडे यांनी दिली.
ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांती करण्यात अहिल्या शिक्षण बजाविलेली भूमिका, समाजहितोपयोगी राबविलेले अनेक उपक्रम त्याच बरोबर संस्थेला गतवर्षी ग्रामीण भागातील आदर्श शिक्षण संस्था हा मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार, ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्वगुणसंपन्न बनविण्यासाठी संस्थेने राबविलेल्या अहिल्या पॅटर्न आदी सर्व गोष्टींची चर्चा महाराष्ट्राच्या पटलावर झाल्यामुळे खुद्द जगविख्यात तत्ववेत्ते जीवन विद्येचे सर्वेसर्वा आदरणीय प्रल्हाद पै हे कार्य अहिल्या शिक्षण संस्थेतील विविध शाखांना भेटी देणार आहेत.
त्यामध्ये ते शनिवार सकाळी 9 वाजता संस्थेच्या कै.बॅ.टी.के.शेंडगे विद्यालयला भेट, त्यानंतर त्यांचे झरे ता.आटपाडी येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयात ठिक ११ वाजता आगमन व स्वागत समारंभ संपन्न होणार आहे.विद्यालयाच्या सभागृहात ठिक ११.२० ला उपस्थित अहिल्या परिवार व जनसमुदायाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर १.३० ते २.३० उपस्थित सर्वांचे स्नेह भोजन.यानंतर दुपारी ३वाजता माण तालुक्यातील विरळी येथील संस्थेच्या श्री.जानुबाई विद्यालयास भेट व त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.
त्यांच्या बरोबर जीवन विद्येचे विश्वस्त,नामधारक, प्रबोधनकार अशी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी झरे पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांनी जीवन विद्येच्या ज्ञानाआमृताचे स्वर्ग सुख घेण्यासाठी सर्वांनी झरे या ठिकाणी शनिवार सकाळी ११वाजता विद्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे चेअरमन आर.एस.चोपडे यांनी केले.