शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन

बातमी Share करा:

 व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे 
 गोदवलेप्रतिनिधी
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष सांगली, जिल्हा परिषद शिक्षण विभाग सांगली, सलाम मुंबई फाउंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्था खटाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त होण्याकरिता तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात येत आहे.
महात्मा गांधी विद्यालय कडेगाव येथे कडेगाव तालुक्यातील ज्या शाळा अद्यापही तंबाखूमुक्त झाल्या नाहीत अशा मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली.उपस्थित सर्व मुख्याध्यापकांना राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमचे(जिल्हा सल्लागार)
डॉ.मुजाहिद आलासकर यांनी तंबाखूचे सेवन केल्यामुळे शरीरावर कोण कोणते दुष्परिणाम होतात व त्यावर उपाययोजना काय आहेत तसेच कोटपा 2003 कायद्याचे प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता मार्गदर्शन केले.  तसेच श्री.रवींद्र कांबळे (तंबाखूमुक्त शाळेचे जिल्हा समन्वयक व सहाय्यक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष) यांनी तंबाखूमुक्त शाळेचे नऊ निकष व टोबॅको फ्री स्कूल माहिती कशा रीतीने भरली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले.
 श्री मालतेश तांदळे  (जिल्हा सोशल वर्कर)  यांनी शाळा तंबाखूमुक्त करून विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्त वातावरण व आरोग्यदायी जीवन जगता यावे यासाठी आरोग्य विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष,शिक्षण विभाग,सलाम मुंबई फाउंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्था,खटाव सांगली जिल्ह्यामध्ये जोमाने काम करीत आहे. तंबाखू मुक्तीसाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत सब सेंटर तालुक्यात चालू करण्यात आली आहेत.या सामाजिक चळवळीमध्ये सर्व क्षेत्रातील लोकांनी सहभाग नोंदवून आपल्या गावामध्ये देखील  तंबाखू मुक्तीची चळवळ उभी करणे गरजेचे  असल्याचे सांगितले.
श्री.अभिजीत पाटील (जिल्हा समुपदेशक राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम) यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षा मार्फत केल्या जाणाऱ्या कामाविषयी माहिती  सांगून शेवटी सर्वांचे आभार मानले.
छाया – कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!