तंबाखू मुक्त व आरोग्य संपन्न शाळा करण्यासाठी कार्यशाळेचे नियोजन
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे (प्रतिनिधी )
गोंदवले –
महानगरपालिका इचलकरंजी शिक्षण विभाग,सलाम मुंबई फाउंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त व आरोग्यसंपन्न शाळा हा उपक्रम इचलकरंजी शहरातील 50 शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.””
शाळेमध्ये प्रामुख्याने पाच सत्र घेण्यात येणार आहेत त्यापैकी पहिला सत्र: “आरोग्याचा पहिला धडा,तंबाखूला नाही म्हणा”
# तंबाखूचे दुष्परिणाम
# तंबाखू मुक्तीसाठी गाव पातळीवरील उपक्रम घेणे करिता माहिती देणे.
सत्र क्रमांक 2 : कायद्याचे पालन करू, परिसर आपले तंबाखूमुक्त ठेवू.
# तंबाखू नियंत्रण कायदा COTPA 2003 महत्त्वाची कलमे.
# तंबाखूमुक्त शाळा आणि निकष विषयी माहिती देणे
सत्र क्रमांक 3: मी स्वच्छ मी बलवान, आजारापासून राहू चार हात लांब
# मला स्वच्छ राहायचे आहे
# योग्य पर्याय निवडा
# ब्रश करण्याची योग्य पद्धत
# पौष्टिक असणारे व नसणाऱ्या अन्नपदार्थ ओळखा
# हात कधी व कसे धुवायचे याविषयी माहिती देणे.
सत्र क्रमांक 4: परिसर स्वच्छ व सुंदर ठेवूया मातृभूमीची शान वाढवूया.
# चला साफसफाई करूया # वर्तमानपत्रा पासून कचराकुंडी बनवणे
# स्वच्छता आणि अस्वच्छता मधील फरक ओळखूया
# योग्य जोड्या जुळवा
# एक पाऊल स्वच्छता दिशेने याविषयी माहिती देणे.
सत्र क्रमांक 5: सकस संतुलित आहार घेऊ आपले,कुटुंब खुशाल ठेवू.
#तुमच्या ताटात कोणते अन्नपदार्थ असावेत
#कोणत्या पदार्थात कोणते जीवनसत्व असतात
#व्यायाम करण्यात मजा आहे
# दररोज पाणी प्या याविषयी माहिती देणे असे अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवून मुलांना तंबाखूचे दुष्परिणाम विषयी जनजागृती आणि आहाराविषयी माहिती तंबाखूमुक्त शाळेचे जिल्हा समन्वयक व सहाय्यक सेवाभावी संस्थेचे (अध्यक्ष) श्री.रवींद्र कांबळे यांनी दिली.
तंबाखू मुक्त शाळा अभियान विषयी शासनाने सांगितलेल्या 9 निकष विषयी माहिती जिल्हा परिषदेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री.शशिकांत कदम यांनी माहिती दिली.तर तंबाखू मुक्तीसाठी शाळा तंबाखूमुक्त करणे का गरजेचे आहे याबाबत माहिती प्रशासन अधिकारी श्री.इरफान पटेल यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र समन्वयक लक्ष्मण काबरे यांनी केले.तर राजेंद्र पाटील सर यांनी आभार मानले .
छाया – कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी