म्हसवड येथे वीजेचा शाक बसून कामगारांचा मृत्यू झाला असून म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा मधुकर काळे वय 30 वर्ष राहणार शंकरवाडी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी सध्या राहणारा म्हसवड तालुका माण जिल्हा सातारा हा येथील कामगार विजेचा शॉक लागून मृत झाला आहे…या घटनेची माहिती , मयताच्या भावाने म्हसवड पोलिसात दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी,
दिगंबर वस्त्रालय येथे कृष्णा मधुकर काळे वय 30 हे काम करीत असताना मालकाने दुकान छता वरची पाण्याची टाकी भरण्यासाठी मोटर चालू केली आहे तू वरती जाऊन पाण्याची टाकी भरली आहे का जाऊन बघ असे सांगितले
नंतर ऋषिकेश गरुड हा इमारतीचे वर पाण्याची टाकी भरली आहे का हे पाहण्यासाठी निघून गेला त्यानंतर कृष्णा काळे लगेच त्याच्या पाठीमागून इमारतीचे वर गेला असता त्यास इलेक्ट्रिक शॉक लागून मयत झाला.याबाबत त्याचा मावस भाऊशाम मधुकर इंगळे वय = 26 वर्ष जात हिंदू मराठा धंदा मजुरी राहणार सहजपूरजवळा तालुका परभणी जिल्हा परभणी सध्या राहाणार म्हसवड तालुका माण जिल्हायाने म्हसवड पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोनि शिवाजीराव विभूते यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार जाधव हे करीत आहेत.