लोक संस्कृती टिकवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे………. रोहिणी शिंदे

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते

कराड: प्रतिनिधी —

       कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथील रणरागिणी महिला मंडळ यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून रणरागिणी जल्लोष हा उपक्रम घेण्यात आला होता

         या कार्यक्रमासाठी उद्योजिका सोनल भोसकर व कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे विद्या पावस्कर प्रमुख उपस्थित होत्या सोनलताई म्हणाल्या की महिला स्वतःच्या पायावरती सक्षम उभे राहून उद्योजक होऊ शकतात शासनाच्या योजना महिलांसाठी उपलब्ध आहेत ग्रामीण भागातील महिलांना पुढाकार घेऊन उद्योजक बनवण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे या कार्यक्रमासाठी रोहिणी शिंदे यांनी रणरागिनी महिला मंडळाचा सामाजिक उपक्रमास आणि ते करत असलेल्या कार्याची दखल शासन दरबारी घ्यावी अशी इच्छा यावेळी रोहिणी शिंदे यांनी व्यक्त केली                    त्या पुढे म्हणाले की आत्ताची युवा पिढी लोकसंस्कृती विसरत चालली आहे ती टिकवण्यासाठी महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून आपल्या लोकसंस्कृती भाषा टिकवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे माझ्यासारख्या मुलीला विचाराचा वारसा असलेल्या कराड शहर नगराध्यक्ष पद भूषवण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे अशा उपक्रमाला माझा नेहमीच पाठिंबा असेल

      या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असलेल्या प्रतिभा साखरे यांनी मंडळाच्या आत्तापर्यंतच्या विविध उपक्रमाची माहिती दिली त्या म्हणाल्या की लोकसंस्कृती वाचवण्यासाठी आम्ही महिला एकजुटीने पुढाकार घेऊन लढा देत आहे महिलांनी योगा बरोबर इतर लोकसंस्कृती विस्मृतीच्या उंबरठ्यावर आहे म्हणून कलागुणातून ती दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे

       यावेळी ओगलेवाडी परिसरातील पंचक्रोशीतील नाव कमावलेल्या महिला ज्यामध्ये डॉक्टर वकील एक भाजीवाली सुद्धा होती अशा 15 महिलांचा मानसन्मान करून त्यांना सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर बाबरमाची हजार माचीराजमाची वनवास माची व विरवडे या पाचही गावातील सरपंच महिला यांचा सत्कार देखील करण्यात आला

         कार्यक्रमासाठी हॉल मिळवून देण्यासाठी श्री शरद कदम सर यांचे फार मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमासाठी रणरागिनीच्या मंडळाच्या अध्यक्षा सौ मीरा कुलकर्णी, उपाध्यक्ष आशा औंधे सचिव प्रतिभा साखरे ,सल्लागार जास्मिन मुलांनी, सल्लागार पूजा मराठे , सदस्य कस्तुरी शहा ,संचिता जोशी ,अनिता सुतार व बाकी सर्व सदस्य यांनी खूप परिश्रम घेतले घरोघरी महिलांना जाऊन कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले होते सर्व मंडळाचा सक्रिय सहभाग होता
तसेच या मंडळासाठी वेळेवर आर्थिक बाब म्हणून विद्या घबाडे यांनी मोलाचे सहकार्य केले त्यामुळे मंडळाची आर्थिक बाजू पेलली गेली. या महिला मेळाव्यात बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!