महीला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे म्हसळा तालुक्यात जंगी स्वागत

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसळा – रायगड

       लाडकी बहीण योजनेच्या किंगमेकर श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार आदिती तटकरे यांना युती सरकारच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा महीला व बालकल्याण मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. नव्या सरकाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपताच मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा श्रीवर्धन मतदार संघात सदिच्छा भेट दिली असता त्यांचे म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप आणि शिवसेना युतीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यानी फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात,फुलांची उधळण करीत जंगी स्वागत केले.

मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वांचे स्वागत स्वीकारत मनोमन धन्यवाद दिले.म्हसळा दिघी नाक्यावर आयोजीत स्वागत कार्यक्रमाला तहसीलदार सचिन खाडे,मुख्याधिकारी विठ्ठल राठोड,स.पो.निरिक्षक संदीप कहाळे,तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,नगराध्यक्ष संजय कर्णिक,महीला अध्यक्षा मिना टिंगरे,मतदार संघ महीला अध्यक्षा सोनल घोले,माजी सभापती बबन मनवे,छाया म्हात्रे,संदीप चाचले,मधुकर गायकर,भाजप तालुका अध्यक्ष तुकाराम पाटील,जिल्हा चिटणीस शैलेश पटेल,शरद चव्हाण,निलेश मांदाडकर,शिवसेनेचे अमर करंबे,स्वप्निल चांदोरकर,गण अध्यक्ष सतीश शिगवण,अनिल बसवत,संतोष सावंत,महेश घोले,किरण पालांडे,प्रकाश लोणशिकर,गजानन जंगम,मंगेश म्हशिलकर,महीला चिटणीस रेश्मा काणसे,नगरसेविका सरोज म्हशिलकर,वृषाली घोसालकर,विध्यार्थी संघटक शाहनवाज उकये,मुबिन हूर्जुक,कोदरे,अनिल टिंगरे आदी मान्यवर पदाधिकारी पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!