शिंगणापूर येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण चोरणारी संशयित महिला गजाआड
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड | प्रतिनिधी
शंभू महादेव मंदिर, शिंगणापूर (ता. माण) येथे दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलेला गर्दीचा फायदा घेत तिच्या गळ्यातील १.७७ लाख रुपये किमतीचे मिनीगंठण चोरल्याप्रकरणी एक महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी दहिवडी पोलीस ठाणे व शिंगणापूर दुरक्षेत्राच्या अंमलदारांनी सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली आहे.
दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी सौ. शोभा तुकाराम काटकर (वय ५५, रा. भोदोले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) या ३० जून २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता शंभू महादेव मंदिर परिसरात दर्शनासाठी आल्या होत्या. गर्दीत दर्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे २१.७५ ग्रॅम वजनाचे, काळ्या मण्यांचे मिनीगंठण अज्ञात व्यक्तीने लबाडीने चोरले. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा उघडकीस आणताना वरिष्ठ पोलीस अधिकारी मा. तुषार दोशी (पोलीस अधीक्षक, सातारा), मा. वैशाली कडुकर (अपर पोलीस अधीक्षक, सातारा), मा. अश्विनी शेंडगे (उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली.
सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, तसेच पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, महिला PSI चांदणी मोटे, स्वाती धोंगडे, API मोहन हांगे, नंदकुमार खाडे, पो. ना. नितीन लोखंडे, पो. का. महेश सोनवलकर, संतोष विरकर आदी अंमलदारांनी शिंगणापूर परिसरात कसून तपास केला.
तपासादरम्यान एका संशयित महिलेवर नजर ठेवल्यानंतर तिला थांबवून महिला अंमलदारांच्या मदतीने तपासणी करण्यात आली. तिचे नाव दिलापली महेश शेंडगे (वय २८, रा. साठेनगर, इंदापूर, जि. पुणे) असे असल्याचे निष्पन्न झाले.
पंचासमक्ष अंगझडती दरम्यान तिच्याकडे चोरी गेलेले मिनीगंठण मिळून आले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली असून, तिच्यावर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून चोरी केलेले १,७७,३०० रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हस्तगत करण्यात आले आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन हांगे करीत आहेत.