शेनवडी गावात महिलेला छेडछाड व मारहाण : गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
सचिन मंगरुळे
म्हसवड: प्रतिनिधी
माण तालुक्यातील म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात विवाहित महिलेला वाईट उद्देशाने छेडछाड करून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सौ. निर्भया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 17 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्या आपल्या मेव्हण्याशी मोबाईलवर व्हिडिओ कॉलवर बोलत होत्या. त्याचवेळी त्यांचा दिर विठ्ठल आप्पा खिलारी हा अचानक आला व अश्लील कृत्य करत त्यांच्या सोबत छेडछाड केली. यावेळी ब्लाऊज मध्ये ठेवलेले 2000 रुपये काढून घेतले. त्यानंतर आरोपीने महिलेला शिवीगाळ, मारहाण करत जीव घेण्याची धमकी दिली.
या प्रकारामुळे फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली असून, या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
सदर घटनेवरून म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पो.नाईक. लुबाळ हे करीत आहेत.

