गोंदवले महाराज मंदिरातून महिला बेपत्ता – पतीकडून दहिवडी पोलिसात तक्रार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

दहिवडी, ता. 15 :
गोंदवले बुद्रुक (ता. माण )येथील प्रसिद्ध गोंदवले महाराज मंदिरातून दर्शनासाठी आलेली महिला बेपत्ता झाली असल्या याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या बाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी
पल्लवी उमेश गडदे (वय 37 वर्षे, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) ही महिला (मंगळवार) सकाळी ७ वाजन्याच्या सुमारास त्या मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. पतीला “मी समाधीचे दर्शन घेऊन येते” असे सांगून त्या निघाल्या, मात्र परत न आल्याने पती उमेश मोहन गडदे (वय ४० वर्षे) यांनी सायंकाळी ४:३९ वाजता दहिवडी पोलीस ठाण्यात आपली पत्नी हरवल्याची फिर्याद दिली .

पल्लवी गडदे यांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे: उंची सुमारे पाच फूट, अंगाने सडपातळ, रंग गोरा, डोक्याचे केस लांब व काळे, चेहरा उभट, नाक सरळ. अंगात मेहंदी रंगाची साडी व त्यावर जुळता ब्लाऊज, गळ्यात काळ्या-पिवळ्या मण्यांचे मंगळसूत्र, नाकात पिवळ्या धातूची चमकी, पायात पांढऱ्या धातूची जोडवी व काळ्या रंगाचे बूट घातलेले होते. त्या मराठी भाषा बोलतात.
नागरिकांनी पल्लवी गडदे यांच्याबाबत कोणतीही माहिती आढळल्यास 8668385562 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन दहिवडी पोलिसांनी केले असून या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि दत्तात्रय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा खाडे सहाय्यक पोलीस फौजदार, दहिवडी पोलीस ठाणे हे करत आहेत.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!