वर्गखोल्या मध्ये आनंदी वातावरण निर्माण झाल्याशिवाय  मुलांची अध्ययनात गती वाढणार नाही: प्रा विजयकुमार कोकरे

बातमी Share करा:

  व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )   

म्हसवड

        शिकण्यात आनंद निर्माण झाला पाहिजे व वर्गखोल्या मध्ये आनंदी वातावरण निर्माण झाल्याशिवाय  मुलांची अध्ययनात गती वाढणार नाही असे उदगार जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटणचे अधिव्याख्याता प्रा विजयकुमार कोकरे यादहिवडी येथे  शिक्षकांच्या प्रशीक्षण प्रसंगी केले.

अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन  व मूल्यमापन प्रशिक्षण दहिवडी येथे तालुकास्तरीय अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण परशुराम शिंदे कन्या विद्यालयांमध्ये अत्यंत उत्साही वातावरणामध्ये पार पडले .दिनांक 16 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये हे प्रशिक्षण होते.

ते पुढे म्हणाले की, शिकणे म्हणजे मुलांनी वाचन,मनन चिंतन करून स्वतःचे विचार व्यक्त करणे, असे सांगून शिक्षकांनी मुले भविष्यवेधी शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन केले.

या प्रशिक्षणासाठी  दत्तात्रय माने,  बाळू सुळ व सौ भारती जाधव यांनी सुलभकाचे काम पाहिले.इतर प्रशिक्षणापेक्षा हे नक्कीच वेगळे असे प्रशिक्षण होते या प्रशिक्षणामध्ये अध्ययनाचे कसे व्यवस्थापन करायचे या विषयावर सविस्तर अशी चर्चा करण्यात आली.  पंचायत समिती माणचे समनवयक बाळू सूळ यांनी सांगितले की,भविष्यवाणी शिक्षणाच्या सहा वेगवेगळ्या पायऱ्या आहेत.यात मुलांना स्वतः शिकण्यास प्रवृत्त करणे, मुलांना आव्हान देणे,  लर्निंग इंटरव्हेंशन (पीआर  लर्निंग ग्रुप लर्निंग आणि विषय मित्र), मुलांच्या अध्ययनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि मुलांच्या शिकण्याची गती तिप्पट  करणे आवश्यक आहे.यावर सविस्तर अशी चर्चा करण्यात आली त्याचबरोबर भारती जाधव यांनीसेल्फी विथ सक्सेस हा भाग घेऊन मुलांच्या जिज्ञासा वृत्तीचा सन्मान करण्याचे आवाहन केले. मार्गदर्शक दत्ता माने यांनी एकविसाव्या शतकामध्ये आवश्यक असणारी जी विविध कौशल्य आहेत  यावर चर्चा करून मार्गदर्शन केले

नव्याने आलेल्या 6Cबद्दल critical thinking,creative thinking, confidence,collaboration ,compassion, व communication याविषयी माहिती देण्यात आली. तसेच प्रशिक्षणाला माननीय गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी भेट देऊन शिक्षकांना भावी पिढी गुणवत्ता पूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षनात लोधवडे  येथील शिक्षक संतराम पवार यांनी कळसूत्री बाहुल्यांच्या उत्कृष्ट  खेळ सादर केला.  प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीला शिकवणारे शिक्षक उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!