श्री संत नामदेव महाराज यांचे स्मारक बनवणे बाबत आमदार जयकुमार गोरे यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
सुनील पोरे यांच्या प्रयत्नांतून खटाव-माण तालुक्यातील आमदार जयकुमार गोरे यांच्या बरोबर श्री संत नामदेव महाराज यांचे स्मारक करणेबाबत राज्य स्तरावर तसेच राष्ट्रीय पातळीवर खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांचे मार्फत रेल्वे प्रशासन जागेबाबत चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर स्मारक विषयाबाबत लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यात यावी अशी विनंती इंजि.सुनील पोरे व नासप अध्यक्ष संजय नेवासकर यांनी आमदार गोरे यांचेकडे केली
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंती निमित्त नासप चे नूतन अध्यक्ष संजयजी नेवासकर यांचा कार्यकर्ते भेठीगाठी व चर्चा कार्यक्रमांतर्गत पंढरपूर , म्हसवड, फलटण, सासवड असा दौरा आयोजित करणेत आला होता या दरम्यान म्हसवड येथे इंजि. सुनिल पोरे यांच्या निवासस्थानी आम.जयकुमार गोरे यांच्या भेटी दरम्यान संत नामदेव महाराज यांचे स्मारक करणे बाबत इंजि. सुनिल पोरे व नासप राष्ट्रीय अध्यक्ष संजय नेवासकर यांची आम.गोरे यांचेबरोबर चर्चा झाली
अध्यक्ष संजयजी नेवासकर यांचा कार्यकर्ते भेठीगाठी व चर्चा कार्यक्रमांतर्गत दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी पंढरपूरला जाताना इंदापूर इथे श्री गणबोटे यांचेकडे पादुका पूजन करून पंढरपूर येथे पोहचले. दुपारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक श्री बालाजी यांचे मार्फत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पादुकाचे सायकल वारी निमित्त पांडुरंग दर्शन आणि आशीर्वाद घेण्यात आला . त्यानंतर पंढरपूर येथील केशवराज संस्था यांचे श्री नामदेव मंदिर इथे पादुका नेण्यात आल्या. मंदिरात श्री संत नामदेवराय यांचे वंशज सर्वश्री माधव महाराज, मुकुंद महाराज तसेच ज्ञानेश्वर महाराज यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आली. जयंत कांबळे आणि राजेश धोकटे सर यांचेकडे चहापान झाले नंतर श्री धनंजय जामदार ( भैयासाहेब) आणि श्री पंकज सूत्रावे यांच्या प्रयत्नांतून ह.भ.प.श्री गहिनीनाथ महाराज, सह – अध्यक्ष यांची वेळ घेऊन जवळ जवळ ४५मिनिटे नियोजित श्रीसंत नामदेव पायरी याबद्दल चर्चा करण्यात आली. ह.भ.प.औसेकर महाराज यांचे मठात श्री गुरुबाबा माऊली यांनी नामदेव पादुकांची आरती केली.रात्री ११ च्या दरम्यान श्रीसंत नामदेव महाराज यांच्या पादुका श्री सूर्यकांत भिसे यांना सायकल वारी साठी हस्तांतरित केल्या. दिनांक २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी निमित श्रीसंत शिरोमणी नामदेव जयंतीचा कार्यक्रमास म्हसवड ( सातारा) येथे जिल्हाध्यक्ष श्री सुनील पोरे यांचे निमंत्रण असल्याने जन्मोत्सव कार्यक्रमास उपस्थितीती लावली . या ठिकाणी मोठ्या संख्येने म्हसवडचा समाज उपस्थित होता. . समाजाबरोबर वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली.
पुण्याकडे येताना फलटण येथे नूतन अध्यक्ष श्री संजयजी नेवासकर यांचा सत्कार करण्यात आला.
नंतर सासवड येथे संत नामदेव मंदिर मध्ये समाजातर्फे श्री वसंतराव भसाळे, चंद्रकांत भसाळे, गोविंद बापू बोत्रे, विक्रांत डोंगरे,उदय निरगुडे, मनोज मांढरे, प्रवीण शिंत्रे आदी यांच्या उपस्थितीत अध्यक्षांचा आणि इतर मान्यवरचा सत्कार करण्यात आला. श्री विक्रांत डोंगरे यांचे कडे उपवास सोडून दौऱ्याची सांगता करण्यात आली.
सदरहू दौऱ्यात अध्यक्ष यांचे बरोबर त्यांच्या आदरतिथ्यशील सुविद्य पत्नी सौ सीमाताई नेवासकर , नासिक विभागीय उपाध्यक्ष रवी अण्णा राहणे, नासिक जिल्हाध्यक्ष अतुलजी मानकर, परिषदेचे अंतर्गत हिशेब तपासनीस अजिंक्य शिंदे, सोलापूर जिल्हाध्यक्ष धनंजयभैया जामदार, पुणे शहर शाखेचे कार्यकारिणी सदस्य पंकज सुत्रावें यांचे समवेत सरचिटणीस डॉ अजय फुटाणे हे उपस्थितीत होते.