प्रशासकीय सेवेचा उपयोग जनतेच्या हितासाठी करणार- ओंकार गुंडगे*
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड येथील अहिंसा पतसंस्थेने आय.ए.एस अधिकारी पदी निवड झालेल्या ओंकार गुंडगे यांचा सत्कार शाल व भेटवस्तू देऊन म्हसवड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांचे हस्ते करण्यातत आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती ॲड.भास्करराव गुंडगे, माजी नगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ, माजी नगरसेवक आप्पा वीरकर हे मान्यवर उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देताना ओंकार गुंडगे म्हणाले माझ्याकडून प्रशासकीय सेवेचा उपयोग जनतेच्या हितासाठी करणार आहे .
माझे शालेय शिक्षण म्हसवड येथे झाले मुळे माझ्या यशात म्हसवडाचाही मोठा वाटा आहे.
यावेळी मनोगतात आण्णासाहेब टाकणे म्हणाले ॲड. ओंकार गुंडगे यांना त्यांची प्रशासकीय सेवा भगवतगीताच्या आधारावर घडावी.
सजगाने सर म्हणाले अहिंसा पतसंस्थेच्या माध्यमातून यशस्वीतांचा सन्मान केला जातो त्यामुळे समाजात चांगला गोष्टी पुढे येतात.
माजी नगराध्यक्ष नितीन दोशी म्हणाले गुंडगे घराण्याला समाजसेवेचा वारसा असून त्या मुशीत घडलेल्या ओंकार गुंडगे हे आय.ए.एस अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेत वेगळाच ठसा उमटवतील. त्याची प्रशासकीय सेवा भारतातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी निश्चितपणे होईल.
ॲड. भास्कर गुंडगे यांनी बोलताना ओंकारच्या लहानपणापासून ते यू.पी.एस.सी.मध्ये निवड होईपर्यंत सर्व प्रवासाचे वर्णन केलेे.
सत्कार समारंभाचे अध्यक्ष मुख्याधिकारी ॲड. सचिन माने म्हणाले माण, खटाव मधील विद्यार्थ्यांना शिक्षणा शिवाय पर्याय नाही उच्च शिक्षण घेऊन विविध विभागात आपल्या भागातील लोकांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हसवड करांच्या वतीने मी ओंकार गुंडगे यांना शुभेच्छा व्यक्त करीत असून त्याच्या अधिकाराचा उपयोग माण, खटावला ही व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी जलसंपदा खात्यात कनिष्ठ अभियंता पदावर निवड झालेले मयूर अनिल गुंडगे यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक निराज व्होरा यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय धट यांनी केले व आभार दीपक मासाळ यांनी मानले.