सातारा -पंढरपूर १५० कि मी सायकल वारीचे म्हसवड येथे स्वागत.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड

    सातारा सायकलिंग क्लबने आयोजित केलेल्या *१५० कि.मी सातारा पंढरपूर सायकल वारी* मध्ये सुमारे दीडशे सायकल स्वारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या वारीमध्ये सायकल स्वारांचे म्हसवड येथे आगमन झाले आणि त्यांचे स्वागत जोरदारपणे करण्यात आले.

        या प्रसंगी, शुभम भारत गॅस एजन्सीच्या वतीने अॅडवोकेट शुभम पोरे यांनी सायकल स्वारांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला आणि त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. सत्कार समारंभात सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, शुभम भारत गॅस एजन्सीचे सहकारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

       वारीचे आयोजन सातारा सायकलिंग क्लबने केले असून, सायकल स्वारांच्या जोशपूर्ण सहभागामुळे हा उपक्रम अधिकच रंगतदार झाला. सायकल वारीमुळे पर्यावरणपूरक वाहतुकीचे महत्व अधोरेखित होत आहे आणि लोकांमध्ये फिटनेसविषयी जागरूकता वाढत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *