कोरेगाव पंढरपूर सायकलवारीचे म्हसवड येथे स्वागत.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड…प्रतिनिधी
       वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच अध्यात्माचा समन्वय साधणाऱ्या कोरेगाव येथील सायकल प्रेमी क्लबच्या सायकलवारी पथकाचे म्हसवड येथे भव्य स्वागत करण्यात आले.
        आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शनासाठी लाखो भाविक पायी जात असतात. मात्र कोरेगाव येथील सायकल प्रेमी क्लब शौकीनानी कोरेगाव ते पंढरपूर अशी सायकल वारी आयोजित केली आहे. या सायकलवारी पथकाचे नेतृत्व नितीन बर्गे, संजय दीक्षित, दिलीप वलियाविटील, सायकल प्रेमी मयूर यांचा सहभाग आहे.
            यामध्ये आभाळवृद्ध तरुण,शालेय विद्यार्थी,व्यवसायिक, नोकरदार अशा प्रवर्गातील निवडक 50 सायकल स्वार सायकलवारी मध्ये सहभाग झालेले आहेत. कोरेगाव ते पंढरपूर हे 130 किलोमीटरचे अंतर सायकल वारीचे पथक एका दिवसात पूर्ण करणार असल्याचे संयोजकांनी सांगितले
         या सायकलवारीचे म्हसवड येथे आगमन होताच क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर नगरसेवक विकास गोंजारी, माजी केंद्रप्रमुख जगन्नाथ वीरकर, शिक्षक नेते राजाराम तोरणे व सौभाग्यवती तोरणे , महादेव चोपडे, अमोल जंगम, अनिकेत इंगवले, इत्यादी मान्यवरांनी सायकलवारीतील मान्यवरांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!