सातारा जिल्हयात १ मार्च पासून हेल्मेट व सीटबेल्ट वापरने बंधनकारक

बातमी Share करा:

 

व्हिजन २४तास न्यूज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड

मा. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी मार्च २०२२ मध्ये हेल्मेट सक्तीचे परिपत्रक काढलेले असून केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ या कायदयान्वये हेल्मेट व सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आलेले असताना बरेचसे नागरीक अजून देखील हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करीत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत असून रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाहन अपघातात मृत्यू पावल्यानंतर इन्शुरन्स कंपनी देखील अपघातावेळी दुचाकी चालकाने हेल्मेट घातले होते का? किंवा चारचाकी चालकाने सीटबेल्ट लावला होता का? याची पडताळणी करीत असते.

        त्यामुळे हेल्मेट व सीटबेल्ट घातल्यास आपला जीव वाचविता येईल तसेच इन्शुरन्स करीता क्लेम करणे देखील सोईचे होईल. तसेच अपघातामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ठाणेस दाखल होणाऱ्या प्रथम खबरी अहवालामध्ये हेल्मेट व सीटबेल्टचा वापर केला असल्यास तशी नोंद घेण्यात येत असते, त्यामुळे अपघातग्रस्तांना इन्शुरन्स कंपनीकडून क्लेम मिळणे सोईचे होते.

तरी याव्दारे सातारा जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, सर्व नागरीकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट व चारचाकी चालविताना सीटबेल्ट वापर करावा.

पोलीस अधीक्षक सातारा, करीता.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!