माण तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपला जन्म झाला आहे.-आ.जयकुमार गोरे
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
By:दिलीपराज किर्तने
म्हसवड प्रतिनिधी :
माण खटाव या दुष्काळी तालुक्याला पाणी देण्यासाठीच आपला जन्म असून माण- खटावच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचवणे हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे .पाणी हाच आपला पक्ष आहे. विचार सातारा जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ,
माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी म्हसवड येथे कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टीच्या ९ वर्षाच्या राजकीय विकास कार्यक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त 22 जून रोजी दहिवडी येथे उपमुख्यमंत्री तथा जलसंधारण मंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.यावेळी माण खटाव तालुक्यातील जनतेला वरदान ठरणाऱ्या जिहे कटापूर जल योजनेचा शुभारंभ होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठीआयोजित कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.
माण खटाव तालुक्यातील दुष्काळी जनतेला पाणी देण्यासाठी आपण राजकारणात प्रवेश केला असून जनतेच्या ताकदीवर आपण सलग तीन वेळा निवडणूक जिंकली आहे या माण आणि खटाव तालुक्यातील जनतेचे ऋण भेटण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
माण खटावला वरदान ठरणाऱ्या जलसिंचन योजना शुभारंभ व जय कटापूर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी माण आणि खटाव तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान या वेळेला आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
मागील सत्तर वर्षांमध्ये काँग्रेसने सत्ता असताना माण खटाव तालुक्यातील सतत दुर्लक्ष केले असून युती काळातील मंजूर असणाऱ्या माण नदीवरील जिहेकटापूर पाणीपुरवठा योजनेचा कार्यक्रम अनुदान मंजूर असून देखील रखडलेला होता.
मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे माण तालुक्यातील शेतकऱ्याच्या बांधावर पाणी देण्याची योजना आगामी एक वर्षात पूर्ण होणार असून पाईपलाईन द्वारे माण तालुक्यातील उत्तर भागातील असणाऱ्या वंचित गावांना पाणी देण्याचं या योजनेतून नियोजन करण्यात येणार आहे पाईप लाईन द्वारे उत्तर भागातील शेतकऱ्यांना जमिनीखालून पाणी देण्यात येणार आहे अशी ही योजना लवकरच कार्यान्वित होणार असून माण तालुक्यातील म्हसवड,मार्डी,मोही, इंजबाव,खडकी,कारखेल,भाटकी,हिंगणी, धुळदेव या उत्तरेकडील भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.. भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी दहिवडी येथे 22 जून रोजी भव्यसभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेसाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी केलेले आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, ओ बी सी युवामोर्चा महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष करण पोरे,माजी नगराध्यक्ष नितीन दोशी विजय धट डॉ.वसंत मासाळ सुरेश म्हेत्रे, नगरसेवक अकिल काझी,बबन अब्दागिरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रासविक भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी केले..