वी पिपल फौंडेशन च्या विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत शालेय विध्यार्थ्यांसाठी “शैक्षणिक शिष्यवृत्ती” आणि शालेय साहित्य वितरण
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड ( वार्ताहर )
वी पिपल फौंडेशन ही संस्था गेल्या अनेक वर्षीपासून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्रभर कार्यरत आहे. ह्या संस्थेच्या विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देवून त्यांच्या शिक्षणाचा वार्षिक खर्च केला जातो.
शनिवार दिनांक १५/०७/२०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दिवड, ता.माण, जि.सातारा येथे “We People Foundation” च्या विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत “शैक्षणिक शिष्यवृत्ती २०२३-२४” साठी निवड झालेल्या १५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शालेय साहित्य सुपूर्त करण्यात आले. या योजने अंतर्गत संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्या वतीने दत्तक घेण्यात आले आहे. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थीना चित्रकला साहित्य वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक अजितकुमार काटकर यांनी केले. फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल जगदाळे यांनी संस्थेच्या विविध उपक्रम आणि कार्याबद्दल माहिती दिली. कार्यक्रम संपन्न करण्यात शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद खाडे सर आणि सहशिक्षक आनंदराव गंबरे सर, सुमन गंबरे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी दिवड गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष राहुल सिध्दू जगदाळे, संस्थापक सदस्य रामचंद्र काकासो सावंत, दादासाे लक्ष्मण सावंत, राहुल किसन सावंत, अंकुर शिवाजी काटकर, अधिक जगदाळे, महेश मोरे, विश्वजीत जगदाळे, विपुल साळुंखे यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.