व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) गणेश मिंड इंदापूर प्रतिनिधी भिगवण परिसरातील नागरिकांना महिला पुरुष व लहान मुलांच्या आरोग्यासाठी शासनाने भिगवन येथे ड्रामा केअर सेंटर चालू करण्यासाठी करोडो रुपये खर्च करून मोठी बिल्डिंग बांधलेली आहे. सर्व प्रकारची साधनसामग्री उपलब्ध करून ड्रामा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने चालू होणे बाकी असताना राज्यकर्त्यांनी उद्घाटन करून ड्रामा केअर सेंटर चालू केलेले आहे परंतु प्रत्यक्षात सदरचे ड्रामा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने चालू झालेले नाही. सदर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे तसेच सदर ट्रामा केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात उपकरणाची कमतरता आहे. तसेच ट्रामा केअर सेंटर मध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे अनेक सुविधांची सदर ठिकाणी अभाव असल्यामुळे परीसरातील नागरीकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. सदर बाबत भिगवन परिसरातील अनेक सामाजिक संघटनांनी शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. शासनाने करोडो रुपये खर्च करून ट्रामा सेंटर चालू करून परिसरातील लोकांना याचा काहीही फायदा होत नसल्याने याबाबत अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. म्हणजेच शासनाने करोडो रुपये खर्च कशासाठी केलेले आहे. असा प्रश्न परीसरातील तरूणांना पडत आहे. त्यामुळे भिगवन परिसरातील सर्व सामाजिक संघटनांचे वतीने दहा दिवसांमध्ये सर्व सुविधांसह ट्रामा केअर सेंटर चालू न केल्यास मोठे जनआंदोलन उभारणार आहे. याची कल्पना शासनास यावी यासाठी पूर्वसूचना म्हणून सदरचे निवेदन देण्यात येत आहे.