वारी पंढरीची… म्हसवड मेडिकल असोसिएशनकडून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड –प्रतिनिधी
आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने पालखीसह मार्गस्थ होत असताना, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक अत्यंत स्तुत्य उपक्रम म्हसवड येथे राबवण्यात येत आहे.

दिनांक 1 जुलै 2025 रोजी, सिद्धनाथ महाराजांच्या पावन नगरी म्हसवड येथे येणाऱ्या सर्व पालखीतील वारकऱ्यांसाठी म्हसवड मेडिकल असोसिएशन मार्फत मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमात सकाळपासून संध्याकाळपर्यंत सेवा दिली जाणार असून, त्याचा लाभ हजारो वारकऱ्यांना होणार आहे.

या सेवेमध्ये म्हसवड व परिसरातील सर्व डॉक्टर्स, मेडिकल असोसिएशन, तसेच माणगंगा पॅरामेडिकल कॉलेज, मासाळवाडी येथील लॅब टेक्निशियन, नर्सिंग स्टाफ यांचे मोलाचे योगदान लाभणार आहे.

या शिबिरात
+सर्वसाधारण आजारांची तपासणी व औषधोपचार
+रक्तदाब, मधुमेह, ताप, थकवा, डिहायड्रेशनसारख्या तक्रारींवर उपचार
+रक्त व लघवी तपासण्या
+गंभीर अवस्थेतील रुग्णांना तात्काळ ऍडमिट करून उपचाराची सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत:

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे – अत्यावश्यक असणाऱ्या रुग्णांना अधिक वैद्यकीय सुविधेसाठी पुढील उपचार केंद्रांमध्ये पाठवण्याचीही पूर्वतयारी करण्यात आली आहे.

म्हसवड मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी व स्वयंसेवक यांचा हा उपक्रम वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून राबवण्यात येत आहे.

सर्व वारकरी भक्तांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


वारकरींच्या पायांतील धूळसुद्धा औषध ठरावी, अशीच सेवा ही आरोग्य तपासणीची वारी ठरणार आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *