सविस्तर वृत्त…श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट, कराड च्या विठामाता विद्यालया च्या विद्यार्थिनींनी क्रीडा संकुल सातारा येथे चालू असलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये भरघोस संपादन केले. 14 वर्षे वयोगट.१) चिनू आप्पासाहेब कांबळे-थाळी फेक, प्रथम क्रमांक.२) चिनू आप्पासाहेब कांबळे-गोळा फेक प्रथम क्रमांक ३) चक्षुका शिरीष लादे.६०० मीटर धावणे-द्वितीय क्रमांक ४) तेजस्विनी रविराज पवार-८० मीटर हर्डल्स मध्ये प्रथम क्रमांक. वरील विद्यार्थिनींची विभागीय स्पर्धेसाठी डेरवण येथे निवड. या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे अध्यक्ष व सचिव श्री जयवंत पांडुरंग पाटील खजिनदार साहेब आणिश्री. बदियानी साहेब आणि तसेच सन्माननीय संचालक यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. थोरात.यु.ए., क्रीडा शिक्षक श्री .पाटील एस.आर. सर व स्वाती कांबळे तसेच सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.