व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) कुलदीप मोहिते कराड
. सविस्तर वृत्त..विठामाता विद्यालयाच्या वतीने 246 विद्यार्थिनी कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये बसल्या होत्या. त्यामध्ये जिल्हास्तराला एकूण 25 विद्यार्थिनींची निवड झाली व राज्यस्तराला 14 विद्यार्थिनी यशस्वी ठरल्या .एकूण 21 जिल्ह्यातील 4000 विद्यार्थ्यांमध्ये आपल्या विद्यार्थिनींची निवड झाली आहे . संस्कृत विषयातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सौ कुलकर्णी सुप्रिया सचिन व विद्यार्थिनींचा कालिदास विद्यापीठाकडून सत्कार करण्यात आला.हा सत्कार सोहळा 8 जून 2024 रोजी सांगली येथे पार पडला. या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे अध्यक्ष व सचिव श्री जयवंत पांडुरंग पाटील खजिनदार श्री संजय सर लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थिनीचे कौतुक केले आहे मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयांच्या मुख्याध्यापिका सौ थोरात यु ए अभिनंदन केले आहे