कराड शहर काँग्रेस ब्लॉकच्या प्रभारी पदी प्रा. विश्वंभर बाबर.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड.. प्रतिनिधी
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष संघटना सक्षम करण्याच्या दृष्टीने कराड शहर ब्लॉक प्रभारी पदी कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा काँग्रेस स्तरा वरून केलेल्या नियुक्तीचे पत्र माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच सातारा येथे प्रा. विश्वंभर बाबर यांना देण्यात आले.यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे , महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष अल्पनाताई यादव, विजयराव कणसे, नरेश देसाई,मनोहर शिंदे यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय यांच्या सूचनेनुसार बूथ , प्रभाग, मंडल कमिट्या व ग्राम कमिट्या संघटितपणे सक्षम करून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून स्थानिक पक्ष नेतृत्वास बरोबर घेऊन पक्ष संघटन वाढवण्याचे काम प्रभारीच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे प्रा. विश्वंभर बाबर यांनी सांगितले .