सातारा जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा कार्यशाळेत विरकरवाडी शाळेचा गौरव

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड, माण तालुका:

सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित “माझी शाळा आदर्श शाळा” कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात विरकरवाडी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेचा विशेष गौरव करण्यात आला. माण तालुक्यातील दुष्काळी भागात असलेल्या या शाळेने मॉडेल स्कूल म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई, महाराष्ट्र कृष्णा खोरे उपाध्यक्ष श्री. महेश शिंदे, जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी विरकरवाडी शाळेची प्रगती आणि विविध उपक्रमांची चित्रफीत दाखवून कौतुक करण्यात आले.

कार्यशाळेत सातारा जिल्ह्यातील 223 शाळांचे प्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, अभियंता, आणि शिक्षक उपस्थित होते. याशनी नागराजन यांनी शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि भौतिक सुविधा सुधारण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.

विरकरवाडी शाळेच्या विकासासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले आणि शाळेच्या भौतिक सुविधा, अद्ययावत संगणक कक्ष, विज्ञान कक्ष, वाचनालय, आणि स्वच्छतागृह यांसारख्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी, विरकरवाडी शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यशाळेत शाळेने शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा क्षेत्र, आणि व्यक्तिमत्व विकासात केलेल्या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!