विजय भागवत यांनी आपल्या सेवाकाळात  सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवले — प्राचार्य दासरे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड दि (प्रतिनिधी)
   आपल्या नोकरीच्या काळात त्याने नोकरी किती वर्षे केली त्यापेक्षा कशी केली हे महत्वाचे आहे असे प्रतिपादन सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजचे प्राचार्य प्रवीण दासरे यांनी केले आहे. ते म्हसवड येथील विजय विश्वनाथ भागवत यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपप्राचार्य सहदेव गुरव शिक्षक प्रतिनिधी संतोष देशमुख, जेष्ठ शिक्षक अजित काटकर उपस्थित होते.
    यावेळी बोलताना प्राचार्य दासरे पुढे म्हणाले की विजय भागवत सरांनी आपल्या ३२ वर्षाच्या नोकरीच्या काळात  विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याबरोबरच त्यांना व्यवहार ज्ञान देण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. विजय भागवत यांनी सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला आहे.भागवत यांनी फलटण, गोंदवले,हणमंतवाडी व म्हसवड येथे आपली उत्कृष्ठ सेवा पूर्ण केली आहे.
    यावेळी उपप्राचार्य सहदेव गुरव म्हणाले शिक्षक हा कदीच सेवानिवृत्त होत नसतो.तो फक्त नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असतो.विजय भागवत हेही फक्त नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या अनुभवाचा शाळेला सतत उपयोग होत राहावा.असे सांगून त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य निरोगी जावो अश्या सदिच्छा व्यक्त केल्या.
      शिक्षक प्रतिनिधी संतोष देशमुख यांनीही आपले विचार व्यक्त केले. अजित काटकर यांनी आभार मानले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!