गोंदवले खुर्द येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले –

        माण तालुक्यातील गोंदवले खुर्द गावच्या हद्दीतील शीलवंत वस्तीच्या सुरज सुनील शीलवंत (वय-२८ वर्षे) या तरुणाने राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयत सुरजचे वडील सुनील जनार्दन शीलवंत (वय -५२ वर्षे) यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

          त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठ्ठल विरकर करीत आहेत.
छाया – सुरज शिलवंत


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!