विधाता सामाजिक संस्था म्हसवड तर्फे अ़ॅड.मिनाक्षी पोळ यांचा सत्कार
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
सहाय्यक सरकारी अभियोक्ता महाराष्ट्र राज्य (वर्ग १) पढ़ी मीनाक्षी पोळ यांची निवड झाल्याबद्दल विधाता सामाजिक संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विधाता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन लोहार अडॅ. आनंदा पोळ (साहेब) ( हायकोर्ट मुबंई अहमद मुल्ला. सर (पत्रकार) परेश शेठ व्होरा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष माण तालुका) सामाजिक कार्यकर्त अजित वेदपाठक व राहुल खाडे . उपस्थित होते
नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता या परीक्षेमधून सहाय्यक सरकारी अभियोक्ता महाराष्ट्र राज्य (वर्ग १) पदी नुकतीच देवापूरच्या अ़ॅड. मीनाक्षी आनंदा पोळ यांची निवड झाली. वयाच्या ४५ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात त्यांनी सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदाला गवसणी घातली.
त्या २३ वर्ष वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या पनवेल जि. रायगड येथे त्या कार्यरत आहेत..त्यांनी एल. एल. बी चे शिक्षण सांगली येथील एन . एस. लॉ कॉलेज येथे पूर्ण केले. सहाय्यक सरकारी
अभियोक्ता या परीक्षेसाठी अँड. मीनाक्षी पोळ यांनी प्रचंड मेहनत घेतली व त्यामुळे त्या पहिल्या प्रयत्नात यश संपादन
करण्यात यशस्वी झाल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत ओपन कॅटेगरी तून ९ व्या तर महाराष्ट्रातून १७ व्या क्रमांक मिळवून त्यानी घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचा विधाता सामाजिक संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला