शहीद जवान नायब सुबेदार शंकर बसाप्पा उकलीकर यांची वीर माता व वीर पत्नी यांचा सैनिक फेडरेशन कडून सन्मान: प्रशांत कदम (माजी सैनिक)
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते कराड
शहीद जवान नायब सुभेदार शंकर बसाप्पा उखळीकर यांची वीर माता वीर पत्नी यांचा रविवारी सैनिक फेडरेशन सातारा यांच्याकडून सन्मान करण्यात आला
शहीद जवान शंकर बसाप्पा उकलीकर दि.१३/१०/२०२४ रोजी प्रथम पुण्य स्मरण अभिवादन सोहळा त्यांचे जन्म गावी कराड तालुक्यातील वसंतगड येथे संपन्न झाला.भारतीय सेनेतील बॉम्बे इंजिनीयर ग्रुप मधील 112 इंजिनीयर रेजिमेंटमध्ये जम्मू कश्मीर येथे कार्यरत असताना शहीद जवान शंकर बसाप्पा उखळीकर यांना वीर मरण आले. त्यांच्या शौर्याला त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांचे प्रथम पुण्यस्मरण अभिवादन सोहळा त्यांच्या जन्म गावी पार पडला यावेळी सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचे वतीने वीर माता व वीर पत्नी यांना शाल व सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.


