ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची अभिनय क्षेत्रातून निवृत्ती; ‘नाम फाउंडेशन’ची जबाबदारी मकरंद अनासपुरेंकडे
व्होजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
गणेश तळेकर
पुणे – प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी अभिनय क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली आहे. “आतापर्यंत खूप काम केलं, पण आता मनासारखं जगावंसं वाटतंय. एक जानेवारीला मी वयाची ७५ वर्षे पूर्ण करेन. त्यानंतर नाटक, सिनेमातून निवृत्त होणार आहे. मात्र गावखेड्यांतील विवंचना समजून घेण्यासाठी आणि समाजकार्यासाठी वेळ द्यायचा आहे,” असे पाटेकर यांनी स्पष्ट केले.
गणेश कला क्रीडा मंच येथे रविवारी झालेल्या ‘नाम फाउंडेशन’च्या दशकपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, “ज्यायोगे खूप काही सांगता येईल अशी कलाकृती आलीच, तर ती करेन; पण अन्यथा मला आता माझ्या पद्धतीने जगू द्या. ‘नाम फाउंडेशन’ची धुरा आता मकरंद अनासपुरेने पुढे न्यावी. पुढील पिढी हे काम उत्तम रित्या पुढे नेत आहे. ‘नाम’चं पुढचं काम मकरंद ठरवेल.”
‘नाम’सारख्या शंभर संस्था निर्माण झाल्या तरी सर्व समस्या सुटणार नाहीत, असेही ते म्हणाले. मात्र “कान धरायला आणि पाठीवर थाप द्यायला मी नक्की असेन,” असे आश्वासन पाटेकर यांनी दिले.

