ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी १०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
गणेश तळेकर
मुंबई : (प्रतिनिधी)
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बुधवार दि. १८ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. १०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मा. श्री. मोहन जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने ठसा उमटवणारे मोहन जोशी यांच्या निवडीमुळे नाट्यवर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी नाट्य संमेलन अधिक भव्य आणि दर्जेदार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य महोत्सवाची सांगता शुक्रवार दि. २४ एप्रिल ते रविवार दि. २६ एप्रिल २०२६ दरम्यान रत्नागिरी येथे होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या महोत्सवात विविध नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कलावंतांचा सन्मान सोहळा आयोजित केला जाणार आहे.
मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेला चालना देणाऱ्या या दोन्ही महत्त्वाच्या घडामोडींमुळे नाट्यरसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
—
आपला,
अजित भुरे
प्रमुख कार्यवाहक

