श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे “विद्यार्थी – व्यापार मेळावा ( Trade Fair 2024)” चे आयोजन मकर संक्रांतीला सोमवार, दि. १५जानेवारी रोजी सकाळी ८ ते १ या वेळेत करण्यात आले आहे. या व्यापार मेळाव्याचे एक पाउल उद्योजकतेकडे हे ब्रीद असून सदर व्यापार मेळाव्याचे उदघाटन संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. अल्ताफहुसेन नसरुद्दीन मुल्ला यांच्या शुभहस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे विश्वस्त व सदस्य अरुण पाटील (काका) तसेच यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत केंगार उपस्थित राहणार आहेत.
या व्यापार मेळाव्यामध्ये जवळजवळ ६० स्टॉल लावले जाणार आहेत. त्यामध्ये खाद्यपदार्थ, शेती उत्पादने, सेंद्रिय उत्पादने, हस्तकलेच्या वस्तू, सौदर्य प्रसाधने व आभूषणे, शोभेच्या वस्तू, सजावटीच्या वस्तू, कपडे, शैक्षणिक साहित्य, मेहंदी विक्री व काढणे, स्केच तयार करणे, फनी गेम्स इत्यादी प्रकारचे स्टॉल असणार आहेत. या व्यापार मेळाव्याला कराड परिसरातील विद्यार्थी, पालक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून वस्तू खरेदी कराव्यात व विद्यार्थांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले आहे.