बिया संकलन मोहीमेत सहभागी होऊ, भावी पिढीला ऑक्सिजन देऊ!:सौ मनीषा काटकर-पायगव्हाणे
व्हिजन २४ तास न्युज (संपादक ;अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनधी
वसुंधरा फाउंडेशन राज्यात गत 19 वर्षापासून प्राण वायु देणाऱ्या झाडांची लागवड करत असून यासाठी बी संकलन मोहीम राबवत असून सातारच्या विविध सामाजिक संघटनांनी व व वृक्षप्रेमी नागरिकांनी बी संकलन करून या चळवळीत योगदान द्यावे असे आव्हान वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष सौ मनीषा काटकर-पायगव्हाणे यांनी केले आहे.
वसुंधरा फाऊंडेशन च्या अध्यक्षा *सौ.मनिषासंजयकाटकर-पायगव्हणेयांच्या नेतृत्वाखाली फाऊंडेशन तर्फे मागील 19 वर्षांपासून प्राणवायू देणाऱ्या झाडांची लागवड व्हावी यासाठी बी संकलन मोहीम राज्यभर राबविण्यात येत असून आपण सुध्दा या चळवळीत सहभागी होऊ या. आपल्या परिसरातील आंबा,कडुनिंब, बदामलालफळवाळलेले,वड,बेल,पिपळ, चिंच, बोर, बीबा,चारोळी,साग, बहावा,अशोक, चिमनसाग,
सेवरी, बेहडा, हरडा,चारोळी, आणि आपल्या परिसरांत उपलब्ध असलेल्या विविध झाडांच्या बीया संकलीत करून परत लागवडीसाठी आम्हाला द्याव्यात. फाऊंडेशन तर्फे कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बीयांवर प्रक्रिया करुन जंगल, खेळांची मैदाने , शेत, बांध,शाळा,रस्त्याच्या दुतर्फा,डोंगर माळरानावर, लोकसहभागातून लागवड केली जाते. तसेच स्वतःहून झाडांची जबाबदारी घेणारे वृक्ष प्रेमी नागरिकांना मागणी नुसार फाऊंडेशन तर्फे देण्याचा मानस आहे. असून बिया ह्या वाळवुन त्यास राख लावुन कापडी किंवा वायर जाळीच्या पिशवीत ठेवले तर उत्तम तयार झालेल्या बिया देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा
श्री. गोविंद पाटील
+91 94218 62262
श्री. संजय नखाते
77559 30825
समन्वयक तथा संचालक वसुंधरा फाऊंडेशन
असे आव्हान वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ मनीषा काटकर पायगव्हाणे यांनी केले आहे
मी लागले बीज संकलनाच्या कामाला , आनंद घेत तुम्ही ही लागा, याचा उद्देश हा सरळ व साधा आहे , पुर्वी आपण गावी किंवा मामाच्या गावाला आंबे, बोर,चिंचा , चारोळी गोळाकरुन झाडावर मजा करण्यास जात होतो,पण आजच्या आपल्या पिढीला हे मिळणं फारच विरळ झालंय , आपण जगणं विसरतोय व प्रत्येक गोष्ट विकत घेतोय हा हरवलेला आनंद आपणच नव्याने मुलांना देऊया व गावाकडे या , रानमेव्याचा भरपुर आनंद घ्या हाच उद्देश …..