उंब्रज भागातील विविध सामाजिक क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश.
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
उंब्रज: कराड श्रीकांत जाधव
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने व पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई व संपर्कप्रमुख श्री शरद जी कणसे साहेब यांच्या उपस्थित दि.१/६/२०२५ रोजी कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृति सदन टाऊन हॉल येथे उंब्रज येथील व उपविभागातील यापूर्वी विविध पक्षात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी तसेच काही विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्षप्रवेश केला
सदर पक्ष प्रवेश हा उंब्रज व उपविभागात आज पर्यंत दिलेला निधी व पक्षात नसतानाही कार्यकर्त्यांना दिलेली आपुलकी व प्रेमाची वागणूक ही भूमिका लक्षात ठेवून व उंब्रज व उपविभागाचा विकास करण्यासाठी श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासारखा महाराष्ट्राचा खंबीर नेता आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहुन शिवसेना गावागावात गावातील प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी पक्षप्रवेश करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले आहे उंब्रज उपविभागातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत येण्यासाठी शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख श्री शरदजी कणसे व सातारा जिल्हा शिवसेना नेते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कराड तालुका प्रमुख श्री तुषार निकम आणि राहुल डहाणे यांनी यशस्वी प्रयत्न केले.पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे शिवसेना आणि शिवसेना नेतृत्व खंबीरपणे उभे राहील असे आश्वासन सातारा जिल्हा पालकमंत्री नामदार श्री शंभूराजे देसाई यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिले.सदर पक्षप्रवेशाची माननीय नामदार व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दखल घेऊन शिवसेनेमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देऊन विकास आणि विकास कामाबद्दलची ग्वाही दिली.पक्षप्रवेश करणारे श्री राहुल जाधव चरेगाव यांनी भारतीय जनता पार्टीतून शिवसेनेत प्रवेश केला आहे. श्री सचिन जाधव राहणार उंब्रज यांनी शिवसेना उबाठा पक्षातून शिवसेनेत प्रवेश सौ.प्रियांका विक्रम वाघमारे ग्रामपंचायत सदस्य उंब्रज व विक्रम संभाजी वाघमारे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला. श्री अतुल चव्हाण सावकार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून शिवसेनेत प्रवेश केला. श्री बाबासाहेब चव्हाण जलचक्र कार यांनी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त गटातून शिवसेनेत प्रवेश केला आहे .श्री नितीन थोरात राहणार उंब्रज यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यांच्यासह विविध राजकीय पक्षातून संघटनातून सामाजिक संस्थातून शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.तसेच यापुढे श्री एकनाथजी शिंदे यांना आपले नेतृत्व मानले आहे.